Monday - Saturday, 8AM to 10PM
Call us now +1 5589 55488 55

स्वयं सहाय्यता युवा गट (SSYG)

संकल्पना :

युवा गटाच्या माध्यमातून अनु. जाती व वंचित/दुर्बल घटकातील युवक-युवतींचा आर्थिक, सामाजिक व वैचारिक विकास साधुन आदर्श नागरिक घडविणे. “स्वयं सहाय्यतेतून सर्वांगीण विकास” .

दृष्टी (Vision) :

युवा गटाच्या माध्यमातून अनु. जाती व वंचित/दुर्बल घटकातील युवक-युवतींचा आर्थिक, सामाजिक व वैचारिक विकास साधुन आदर्श नागरिक घडविणे.

उद्घाटन :

बार्टीमार्फत महाराष्ट्र राज्यातील गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील युवक-युवतींचे स्वयंसहाय्यता युवा गट छत्रपती राजश्री शाहु महाराज जयंती निमित्त दि. 26 जून 2021 रोजीपासून सुरु करण्यात आले आहेत.

युवा व्याख्या :

(SSYG) स्वयं सहाय्यता युवा गट या संकल्पनेत युवा म्हणजे असे युवक किंवा युवती जे अनु. जातीतील किंवा वंचित/दुर्बल घटकातील असुन त्यांचे वयवर्षे 18 वर्षे पुर्ण आहे.

ध्येय व उद्दिष्टे :

सामाजिक समता निर्माण करण्यासाठी अनु.जाती व वंचित घटकातील 10-15 युवक-यवुतींना एकत्रित करुन आर्थिक, व्यावसायिक व सामाजिक विकास साधण्यासाठी उद्योजकता व कौशल्य विकास उद्योग-व्यवसाय करण्यास मार्गदर्शन, प्रशिक्षण देऊन स्व-विकास व समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करुन घेणे.

पात्रता :

युवा गटातील सदस्य हा अनुसुचित जातीचा, महाराष्ट्रातील रहिवासी आणि वयवर्षे 18 ते 45 पर्यंत असावे तसेच किमान 10वी पास असावा.

युवा गटाची कार्यप्रणाली व भुमिका :

समतादूत : समतादुतांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील युवा नागरिकांचा शोध घेणे, त्यांना स्वयंसहाय्यता युवा गटाची संकल्पना सांगणे, गटाची बांधणी करणे, स्वयंसहाय्यता युवा गटाच्या पाक्षिक/मासिक बैठका घेणे. या बैठकांमध्ये प्रकल्प अधिकारी, सहा. आयुक्त, समाज कल्याण, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे मार्गदर्शन आयोजित करणे.

प्रकल्प अधिकारी : स्वयं सहाय्यता युवा गटाच्या मागणीनूसार तसेच निवडलेल्या उद्योग-व्यवसायाच्या अनुषंगाने शासनाच्या विविध यंत्रणांसोबत समन्वय साधुन स्वयं सहाय्यता युवा गटाच्या सदस्यांना प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे. तसेच सहा. आयुक्त समाज कल्याण, समाज कल्याण अधिकारी, जि.प. व जिल्हास्तरावरील शासकीय प्रशिक्षण केंद्रांसोबत तसेच बॅक, महामंडळ यांच्यासोबत समन्वय साधणे, स्वयं सहाय्यता युवा गटाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणे.

स्वयं सहाय्यता युवा गट : स्गटातील सदस्यांनी वेळोवेळी बैठकी घेणे, बैठकीला उपस्थित राहणे, गटाचा उद्योग ठरविणे, त्यानुसार समतादूतांच्या मदतीने निवडलेल्या व्यसायाचे प्रशिक्षण घेणे, स्व-भांडवल निर्माण करुन कर्जयोजनेच्या सहाय्याने उद्योग-व्यवसाय सुरु करणे, गटाच्यामाध्यमातून सामाजिक विकासाच्या योजनांची माहिती घेऊन गावातील नागरिकांमध्ये प्रचार-प्रसार करणे.

सहा. आयुक्त, समाज कल्याण : युवा गट या माध्यमातून अनु. जाती व वंचित/दुर्बल घटकातील युवक व युवतींचा आर्थिक, सामाजिक व वैचारीक विकास साधण्याच्या अनुषंगाने स्वयं सहाय्यता युवा गट कामकाजासाठी मार्गदर्शन करणे, समाज कल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांना योजनांचा लाभ प्राधान्यांने मिळवुन देणे, यासाठी समतादूत, प्रकल्प अधिकारी व युवा गटातील सदस्यांना मार्गदर्शन करणे.

समाज कल्याण अधिकारी, जि.प. : युवा गट या माध्यमातून अनु. जाती व वंचित/दुर्बल घटकातील युवक व युवतींचा आर्थिक, सामाजिक व वैचारीक विकास साधण्याच्या अनुषंगाने स्वयं सहाय्यता युवा गट कामकाजासाठी मार्गदर्शन करणे, जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांना योजनांचा लाभ प्राधान्यांने मिळवुन देणे, यासाठी समतादूत, प्रकल्प अधिकारी व युवा गटातील सदस्यांना मार्गदर्शन करणे.

बार्टीची भुमिका : राज्यस्तरीय विविध यंत्रणांशी समन्वय साधणे, स्वयं सहाय्यता युवा गटातील सदस्यांना बचत गट, क्लस्टर, संविधान प्रचार-प्रसार, कायदेशीर तरतुदी व अत्याचार प्रतिबंध अधिनियम इ. विषयावर प्रशिक्षण देणे, आवश्यक कौशल्य, आर्थिक मदत, मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण देणे, माविम, MSRLM, ग्राम परिवर्तक, कृषी गट, कुटुंब श्री इत्यादी योजनांच्या संकल्पना आधारित कार्य प्रणालीचे नियोजन करणे, युवा गटामार्फत प्राप्त प्रस्तावाचे शासनस्तरावर झालेल्या कार्यवाहीबाबत पाठपुरावा करणे. तसेच बार्टी, समाज कल्याण, जिल्हा परिषद योजनांचा लाभ प्राधान्याने युवा गटातील सदस्यांना मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे

प्रशिक्षण कृती आराखडा : गटाच्या सदस्यांची गरज, निवड आणि आर्थिकता याचा अंदाज घेऊन जिल्हास्तरावरील उद्योग विकास विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांसोबत समन्वय साधुन युवा गटा सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळापत्रक तयार करणे.

  • प्रथम टप्पा : उद्योजकता परिचय कार्यक्रम (EAP)
  • कालावधी – 1 दिवस
  • ठिकाण : सोयीचे ठिकाणी (4 ते 5 गावे मिळून मध्यवर्ती ठिकाण)
  • साधन व्यक्ती: जिल्हा उद्योग केंद्र निरिक्षक
  • म.उ.वि. (MCED) प्रकल्प अधिकारी
  • खादी ग्रामद्योग – अधिकारी (ता.खा.ग्रा.अ)
  • कृषी विज्ञान केंद्र – संशाधन सहाय्यक/तंत्रज्ञ
  • RSETI प्रशिक्षण समन्वयक
  • दुसरा टप्पा : उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP)
  • कालावधी – 7 ते 15 दिवस
  • ठिकाण : संबधित यंत्रणाचे प्रशिक्षण स्थळ (निवासी/अनिवासी)
  • साधन व्यक्ती: जिल्हा उद्योग केंद्र निरिक्षक
  • म.उ.वि.क.(MCED) प्रकल्प अधिकारी
  • खादी ग्रामद्योग – अधिकारी (ता.खा.ग्रा.अ)
  • कृषी विज्ञान केंद्र – संशाधन सहाय्यक/तंत्रज्ञ
  • RSETI प्रशिक्षण समन्वयक

प्रशिक्षण समन्वय यंत्रणा : अग्रणी बँक (जिल्हा), जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा परिषद, महानगर पालिका, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी, खादी ग्रामोद्योग मंडळ या यंत्रणेसोबत समन्वय साधणे व प्रशिक्षण उपलब्ध करुन घेणे.

प्रत्यक्षात सध्यस्थितीमधील काम : महाराष्ट्रातील एकूण स्वयंसहाय्यता युवा गटाची संख्या: 3677 असुन 31622 युवक-युवकांचा सहभाग आहे. समतादूत गावातील नागरिकांना युवागटाची माहिती देऊन स्वय सहाय्यता युवा गट तयार करण्यसाठी प्रेरणा देतांनाचे काही दृश्य